गावातील अंगणवाडी, प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय, पद्मभूषण वि. स. खांडकर सार्वजनिक वाचनालय, स्वामी विवेकानंद स्पर्धा परीक्षा अभ्यासिका अशा माध्यमातून शैक्षणिक विकासाची वाट खुली झाली आहे.
गावातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती विविध स्पर्धा परीक्षा, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धांमधून दिसून येत आहे.
अनेक होतकरू तरुण सरकारी सेवांमध्ये घडताना दिसत आहेत.
विद्या मंदिर सावर्डे दुमाला प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समितीच्या पुढाकाराने ग्रामपंचायतीचे सहकार्य व लोकसहभागातून सुरू होत असलेले ‘आनंददायी बाल पुस्तकालय वाचन चळवळी’त एक नवा आयाम निर्माण करून देईल.
शाळेतील ‘माझी शाळा माझा अभिमान’ या उपक्रमाला गावातील शिक्षक, शिक्षणप्रेमी, युवक, पालक, सामाजिक संस्था व सामाजिक कार्यकर्ते यांचे विशेष मार्गदर्शन पाठबळ मिळत आहे.
सावर्डे दुमाला येथे इ.१ ली ते ५ वी पर्यत वर्ग आहेत.तसेच शाळेत सुसज्ज वाचनालय आहे.
इ.१ ली २ री साठी KTS स्पर्धा परीक्षा घेतली जाते केंद्रस्तरावर,तालुक्यापर्यत यश मिळाले.
इ.४ थी प्रज्ञाशोध परीक्षेत यश मिळाले व इ.५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत मुलांनी यश मिळवले आहे.
सध्या शाळेत शिक्षक ५ कार्यरत आहेत ते उच्चविद्याविभूषित आहेत.त्यामुळे मुले गुणवंत,शिस्तप्रिय झाली आहेत.
प्रशस्त आर.सी.सी.इमारत आहे.प्रत्येक वर्गात ई-लर्निंग सुविधा आहे.तसेच प्रशस्त मैदान,संरक्षक भिंत आहे.
हँडवॉश स्टेशन आहे.मुलामुलीसाठी स्वतंत्र सुसज्ज स्वच्छतागृह आहेत. शैक्षणिक साधन युक्त वर्ग आहेत.
शालेय पोषण आहार पूरक व दर्जेदार दिला जातो.मुलांच्यामध्ये नैतिक मूल्य रुजविली जातात.
छोट्या –मोठ्या सहलीचे नियोजन असते.तसेच वार्षिक स्नेहसंमेलन प्रत्येक वर्षी असते.आमची शाळा स्वच्छ व सुंदर आहे.
- विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध प्रयत्न केले जातात.
- येथे शिक्षणासोबतच संस्कार, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांना विशेष महत्त्व दिले जाते